image credit: yavatmal.gov.in
यवतमाळ जिह्याची इतिहासीक माहिती History about Yavatmal Distric.
यवतमाळ शहराचे पूर्वीचे नाव यवत किंवा यवती , योतमाड असे होते . आजूबाजूला दाट व उंच झाडांची दाटी असल्यामुळे याला योतमाड असे नाव पडले होते . नंतर याला यवतमाळ म्हणजे माळावर वसले असल्या मुळे यवतमाळ म्हणायला सुरवात झाली .
ऐन -ई -अकबरी या प्राचीन ग्रंथात यवतमाळ चा उल्लेख दिसून येतो . तसेच अकबर च्या दरबारात अबुल फाजल याच्या लेखकात यवतमाळ मधील योत लोहार या गावाचा उल्लेख पाहायला मिळतो . १९३० साली प्रसिद्ध झालेल्या केसरी प्रबोध या ग्रंथात यवत म्हणून यवतमाळ चा उल्लेख मिळतो .
यवतमाळ (सध्या यवतमाळ जिल्हा) नंतरचा प्रदेश, अलाउद्दीन हसन बहमन शाह यांच्या राजवटीत १३४७ मध्ये बहमनी सल्तनतीची स्थापना केली. १५७२ साली, अहमदनगर सल्तनत (वर्तमान दिवस अहमदनगर जिल्हा ) चे शासक मुर्तजा शाह, यवतमाळ जिल्हा १५९६ मध्ये, अहमदनगरच्या योद्धा रानी चांद बीबीने यवतमाळ जिल्ह्याचे मुघल साम्राज्य, नंतर भारतातील मोठ्या भागाचे राज्यकर्ते सोडले.
१७०७ मध्ये सहाव्या मुघल सम्राट औरंगजेबच्या मृत्यूनंतर यवतमाळ हा मराठा साम्राज्यात गेला. १७८३ मध्ये जेव्हा रघोजी भोसले नागपूर साम्राज्याचे शासक झाले तेव्हा त्यांनी आपल्या क्षेत्रात यवतमाळ जिल्हाचा समावेश केला.
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने १८५३ मध्ये बेरार प्रांत उभारल्यानंतर १८६३ मध्ये यवतमाळ पूर्वेकडील बेरार जिल्हा बनला आणि नंतर दक्षिण पूर्व बेरार जिल्हा-मध्य प्रांत आणि बेरार या दोन्ही जिल्ह्यांचा भाग बनला.
यवतमाळ १९५६ पर्यंत राज्य पुनर्रचना होईपर्यंत मध्यप्रदेश भाग राहिला. १ जानेवारी १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याने यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.
१९०५ पर्यंत जिल्याचे ठिकाण वाणी होते नंतर याला यवतमाळ करण्यात आले.
यवतमाळ जिल्हा बद्दल स्थान व विस्तार Location and extension about Yavatmal district
यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रा च्या पूर्व भागात आहे . महाराष्ट्रा चा पूर्व भाग म्हणजे विदर्भ असे सुद्धा ओळखले जाते . यवतमाळ जिल्हा हा अमरावती या प्रशासकीय भागात येतो . आणि प्रादेशिक भाग म्हणजे विदर्भ होय . यवतमाळ जिल्हाचे क्षेत्रफळ १३५८४ चौ . किलोमीटर इतके आहे.
यवतमाळ जिल्याने महाराष्ट्रा चा ऐकून ४.४% इतका भाग व्यापला आहे . महाराष्ट्रा च्या क्षेत्रफळा नुसार यवतमाळ जिल्याचा ६ वा क्रमांक लागतो . तसेच अमरावती विभागा मध्ये यवतमाळ चा १ ला क्रमांक लागतो .
यवतमाळ जिल्ह्याचा सगळ्यात मोठा तालुका म्हणजे उमरखेड तालुका आहे . आणि सगळ्यात छोटा तालुका म्हणजे झरी जामणी तालुका होय . यवतमाळ जिल्ह्याची पूर्व पश्चिम लांबी १९२ किलोमीटर व दक्षिण उत्तर लांबी १६० किलोमीटर इतकी आहे . तसेच यवतमाळ जिल्हाचे अक्षांश १९° २६' ते २०° ४२' उत्तर, व रेखांश ७७° १८' ते ७९° ९८' पूर्व असे आहेत .
यवतमाळ जिल्ह्याला ६ जिल्ह्याची सीमा लागत आहे . पूर्व ला चंद्रपूर , पश्चिम ला वाशीम व हिंगोली, उत्तर ला वर्धा व अमरावती आणि दक्षिण ला नांदेड . यवतमाळ जिल्ह्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून असून तेलंगणा मधील आदिलाबाद हे जिल्हा लागून आहे .
यवतमाळ च्या पूर्वेला वाणी तालुका लागून आहे, पश्चिमला पुसद तालुका लागून आहे, अगदी उत्तरेस बाभुळगाव व अगदी दक्षिणेस उमरखेड तालुका लागून आहे .
यवतमाळ मधील ऐकून तालुके Total Taluka Of Yavatmal District
यवतमाळ जिल्ह्यात ऐकून १६ तालुके आहेत .
१. पुसद
२. नेर
३. बाभुळगाव
४. झरी जामणी
५. दिग्रस
६. उमरखेड
७. वाणी
८. राळेगाव
९. दारव्हा
१०. मारेगाव
११. महागाव
१२. पांढरकवडा
१३. कळंब
१४. घाटंजी
१५. आर्णी
१६. यवतमाळ